जिल्हाधिकारी नितेश पाटील तसेच डीसीपी रवींद्र गडादी यांनी त्वरित कार्यवाही केल्याने , शहापूर पोलीस तसेच फेसबुक फ्रेंडच्या सहकार्याने एकाकी आजारी वृद्ध व्यक्तीला तातडीने उपचार मिळाले
परशुराम कांबळे असे या वृद्ध आजारी व्यक्तीचे नाव असून , त्यांची पत्नी आणि दोघे मुलगे ह्यात नाहीत . पडक्या जुन्या घरात , वृद्धापकाळामुळे आजारी झाल्याने ते अंथरुणाला खिळून होते . त्यांचे अन्नपाण्याची देखील हाल होत होते . शेजारी अन्नपाणी देत होते मात्र घरात मलमूत्राची दुर्गंधी सुटल्याने कोणीही घरात जायला तयार नव्हते . शेजाऱ्यांनी याची माहिती जिल्हाधिकारी तसेच डीसीपी रवींद्र गडादी याना दिली . त्यांनी तातडीने कार्यवाही करून फेसबुक फ्रेंड तसेच शहापूर पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांना कळवले . त्यानंतर पीआय सुनीलकुमार , पीएसआय मंजुनाथ नाईक , हेड कॉन्स्टेबल बसप्पा कुरबर तसेच सचिन हुनवडे यांनी तसेच फेसबुकफ्रेंड सर्कल टीमचे संतोष दरेकर , सौरभ सावंत आणि बसवराज हिरेमठ , पद्मप्रसाद हुली यांनी रुग्णाला घराबाहेर आणून 108 रुग्णवाहिकेत ठेवण्यास मदत केली.
बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ , अशोक शेट्टी आणि डॉ . विजय कुमार पाटील यांनी या रुग्णाला मेडिसिन वॉर्डमध्ये दाखल करून घेऊन उपचार सुरु केले आहेत .


Recent Comments