Belagavi

बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीतर्फे प्रजासत्ताक दिन स्केटिंग रॅली

Share

बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे 50 स्केटर सहभागी झाले होते.

बेळगावातील गोवावेस स्विमिंग पूल स्केटिंग रिंकवर प्रजासत्ताक दिनानिमित्त स्केटिंग रॅली घेण्यात आली. या रॅलीमध्ये 4 ते 16 वयोगटातील सुमारे 50 स्केटर सहभागी झाले होते. एकूण 2 किमी अंतराची ही रॅली प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शूभेच्छा देत “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीची सुरवात सुभेदार माणिक भुते, यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी शिरोडकर, माडीवाले, पाटील, अशोक गोरे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव, क्लिफ्टन बेरेटो, बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचे खेळाडू व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags: