Vijayapura

काँग्रेस पक्षाचा दोन टप्पात प्रचार , सिद्धरामय्या करणार 112 मतदारसंघात प्रचार

Share

विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत .18 मे पर्यंत नवीन विधानसभेची स्थापना व्हावी, अशा प्रकारे काँग्रेस पक्षानेही दोन टप्प्यात निवडणूक प्रचार सुरू केला आहे. अशी माहिती काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज रायरेड्डी यांनी दिली .

विजापूर मध्ये माहिती देताना त्यांनी सांगितले कि , काँग्रेस पक्ष निवडणुकीची तयारी करत आहे. भाजप सरकारची जनविरोधी धोरणे जनतेपर्यंत पोहोचवली जात आहेत.
एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रचार केला जात आहे दोन्ही संघ ३ फेब्रुवारीपासून राज्याचा दौरा करणार आहेत.
सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली बसवकल्याण येथून यात्रा सुरू होईल, प्रजाध्वनी बस यात्रा कार्यक्रम त्याचवेळी जाहीर करून , सिद्धरामय्या 112 मतदारसंघात प्रचार करणार आहेत.
11 फेब्रुवारीला यात्रेचे विजापूर जिल्ह्यात सिंदगी, इंडी , नागठाण मतदारसंघात आगमन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

12 फेब्रुवारी रोजी बबलेश्वर, देवर हिप्परगी, बसवन बागेवाडी येथे यात्रा काढण्यात येणार असून
21 फेब्रुवारीला मुद्देबिहाळ मतदान केंद्रावर ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या पक्षात अंतर्गत कलह नाहीत . विधीमंडळ पक्षनेते झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवू. यावर हायकमांड निर्णय घेईल. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची घोषणा आमच्याकडे करीत नाही, असे ते म्हणाले मी पुढचा मुख्यमंत्री असे कोणीही म्हणू शकेल, पण ते पक्ष ठरवेल, असे ते म्हणाले.
पक्षांतर करणारे आमचेच आहेत. ज्या पक्षांतरामुळे भाजपचे सरकार स्थापन केले ते आमचेच आहेत कारण भाजपने त्यांना आमिष दाखवले, त्यांनी काँग्रेस सोडून भाजप पक्षात उडी घेतली आणि आता सत्तेचा आनंद लुटत आहेत, असे रायरेड्डी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये पुनरागमन करण्याबाबत ते म्हणाले की, त्यांना पुन्हा पक्षात यायचे कि नाही ही त्यांची वैयक्तिक बाब आहे.
एकंदरीत काँग्रेस पक्षानेदेखील विजापुरात निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असल्याचे , माजी मंत्री रायरेड्डी यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे .

Tags: