प्रजासत्ताक दिन म्हणजे देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहे. बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या रक्तात राष्ट्रप्रेम ठासून भरले आहे. देशभक्तीचे हे संचित घेऊन एकसंघ, श्रेष्ठ भारत बनवण्याचा संकल्प आजच्या दिवशी करू असे आवाहन जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी केले.
बेळगावात जिल्हा स्टेडियमवर 74 व्या प्रजासत्ताक दिन समारंभात ध्वज फडकावल्यानंतर बोलताना पालक मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, बेळगाव ही स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या वीरांची भूमी आहे. म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान पुरुषांचा पदस्पर्श लाभलेली ही पुण्यभूमी आहे. महाराष्ट्र, गोवा या वसलेल्या बेळगावमध्ये विविध भाषा, संस्कृतीचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात हे येथील वैशिष्ट्य आहे.
डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीने परिपूर्ण सामाजिक न्याय आणि व्यक्तिस्वातंत्र्य देणाऱ्या घटनेमुळे भारत आज जगातील एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. भारतीय प्रजासत्ताकाने भारतातील प्रत्येक नागरिकाला व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन मुलभूत हक्क बहाल केले आहेत.

पानपत्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे मार्गदर्शन यामुळे बेळगाव जिल्हा सर्व क्षेत्रात आघाडी घेत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जिल्ह्यातील 5.59 लाख शेतकऱ्यांना 111.17 कोटींचा थेट लाभ मिळवून देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेतून जिल्ह्यात 236 घटकांना बँकेतून अर्थसाह्य मिळवून देऊन कार्यान्वित करण्यात आले आहेत. ही संपूर्ण राज्यात मोठी संख्या आहे असे सांगून पालकमंत्री कारजोळ यांनी जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. बाईट
प्रारंभी महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतरकेएसआरपी, डीएआर, सिव्हिल, महिला सिव्हिल पोलीस, होमगार्ड्स, एक्साईज, एनसीसी छात्र, भारत सेवादलाच्या अगसगे हायस्कूल, महिला विद्यालय, मोरारजी देसाई निवासी शाळा, मराठा मंडळ, सिद्धरामेश्वर इंग्लिश हायस्कूल, वनिता विद्यालय, शेख सेंट्रल स्कूल, माहेश्वरी अंधशाळेचे विध्यार्थी आदींच्या 20 तुकड्यांनी शानदार संचलन करून पालकमंत्री कारजोळ यांना मानवंदना दिली. तत्पूर्वी पालकमंत्री कारजोळ यांनी संचलनाचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली.
यावेळी प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिपं सीईओ दर्शन एच. व्ही., शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्यासह अनेक अधिकारी, मान्यवर, निमंत्रित उपस्थित होते.


Recent Comments