Belagavi

बेळगावात माघी गणेश जयंती भक्तिभावाने साजरी

Share

बेळगाव शहर आणि उपनगरात माघी गणेश जयंती श्रद्धा-भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त गणेश मंदिरामंध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

माघी गणेश जयंतीनिमित्त बेळगावातील अनेक गणेश मंदिरांमध्ये सकाळपासून अनेक धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, गणहोम, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेहरूनगर, सदाशिवनगर हरिद्रा गणेश मंदिर, अशोकनगर, वडगाव, शहापूर, टिळकवाडी, गणेशपूर, चन्नम्मा चौक मंदिर, हिंडलगा गणपती आदी गणेश मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली होती. यानिमित्त पूजा साहित्याचीही मोठी खरेदी-विक्री झाली.


सर्वच वयोगटातील भक्त भक्त सकाळपासूनच गणेश मंदिरांना भेटी देऊन लाडक्या बाप्पांचे दर्शन घेताना दिसून आले. महिला भक्तांनी पाळणागीते गायिली. आ. अनिल बेनके यांनी अनेक मंदिरात जाऊन गणेशाची पूजा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोणताही धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव असो बेळगाव शहरामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो.

अनेक गणेश मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. गणपती बाप्पा सर्वाना सुख, समाधान, सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना त्यांनी यानिमित्ताने केली.


दरम्यान, माघी गणेश जयंतीनिमित्त हिंडलगा गणपती मंदिरासह अनेक ठिकाणच्या गणेश मंदिरांमध्ये दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

Tags: