विजापूर विमानतळाचे उद्घाटन आणि रेवण सिद्धेश्वर उपसा सिंचन प्रकल्पाच्या पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असल्याची माहिती जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
विजापूर शहराच्या बाह्य विभागातील बुऱ्हानपूर ते मदभावी गावादरम्यान सुरु असलेल्या विमानतळाच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, विमानतळाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे.
15 ते 20 फेब्रुवारीच्या आत शिल्लक काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत.
फेब्रु. 20 तारखेनंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच रेवण सिद्धेश्वर पाटबंधारे प्रकल्पाची पायाभरणीही मोदींच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिमोगा विमानतळाचे उद्घाटन याच महिन्यात होऊ शकते. उशीर झाल्यास विजापूर आणि शिमोगा विमानतळांचे उद्घाटन एकाच दिवशी होऊ शकते, असे ते म्हणाले.
एकंदर, विधानसभा निवडणुकीपूर्वीच बहुप्रतीक्षित विजापूर विमानतळाचे उदघाटन होणार हे मंत्री कारजोळ यांच्या माहितीवरून दिसते.


Recent Comments