तुमकूर येथे आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सिद्धगंगा मठाचे डॉ. शिवकुमार स्वामी यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात सहभाग घेतला.


चालता-बोलता देव मानले जाणारे तुमकूरच्या श्री सिद्धगंगा मठाचे पूज्य श्री शिवकुमार स्वामीजी यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भाग घेऊन स्वामीजींना नमन केले. यावेळी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मठाचे उत्तराधिकारी श्री सिद्धगंगा महास्वामीजी, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, कायदा मंत्री जे. सी. माधुस्वामी, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, सहकार मंत्री सोमशेखर, शिक्षण मंत्री बी. सी. नागेश, आ. व्ही. सोमण्णा आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.


Recent Comments