बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेमन जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली .
बेळगाव जिल्हा प्रशासन , जिल्हा पंचायत , महानगर पालिका , तसेच कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने वेमन जयंतीचे आयोजन करण्यात आले होते . या निमित्ताने शहरात मिरवणूक काढण्यात आली .

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ .नितेश पाटील यांनी वेमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून , मिरवणुकीचा शुभारंभ केला .
जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु झालेल्या या मिरवणुकीत धनगरी ढोल , विविध कलापथके सहभागी झाली होती .

या मिरवणुकीत , जिल्ह्धिकारी डॉ .नितेश पाटील, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री , बावलत्ती , राजेंद्र पाटील , टी के पाटील, रेड्डी समाजाचे अध्यक्ष रामण्णा मुल्लुर , आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

सदाशिवनगरातील रेड्डी भवनाजवळ या मिरवणुकीची सांगता करण्यात आली .


Recent Comments