डोक्यात दगड घालून एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा विजापूरच्या अलकुंटे नगरमध्ये घडली.
मल्लिकार्जुन दोडमणी (43) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्याचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीनी खून करून ते फरार झाले आहेत. मृत मल्लिकार्जुन हा यापूर्वी विजापूरचे खासदार रमेश जिगजिनगी यांचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता.
काल रात्री मल्लिकार्जुन आपल्या मोठ्या बहिणीला सोडण्यासाठी तिच्या घरी गेला होता . तिथून परतत असताना त्याचा खून झाला . तीन वर्षांपूर्वी त्यांनी येथील नोकरी सोडली. तसेच, मल्लिकार्जुनच्या हत्येमागे आर्थिक व्यवसायच कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांना आहे .
एएसपी शंकर मारिहाळ , आदर्शनगरचे पीएसआय यतिश , श्वान पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Recent Comments