Belagavi

मोहन मोरे इलेव्हन संघाने पटकावली अनिल बेनके ट्रॉफी

Share

अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या सरदारांस मैदानांवर आयोजित क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्याने , विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी आ . अनिल बेनके यांची प्रशंसा व्यक्त केली .

ते आज अनिल बेनके पुरस्कृत अनिल बेनके ट्रॉफी च्या सांगता समारंभात बोलत होते . ते म्हणाले कि , बेळगावमध्ये १५ वर्षांपूर्वी क्रिकेट स्पर्धा होत होत्या . मात्र त्या बंद पडल्या होत्या . मात्र आ . अनिल बेनके यांनी क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरु करून , बेळगावमधील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो तसेच बेनके साहेबांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत असे सांगितले .

तर अनिल बेनके ट्रॉफी च्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले बेळगाव दक्षिणचे आ . अभय पाटील म्हणाले कि , बेळगावच्या लोकांना एक नवी दिशा देण्याचे काम करण्यात येत आहे . पंधरा वर्षांपूर्वी क्रिकेट स्पर्धा होत होत्या . त्या पुन्हा सुरु करण्याचे काम आ . अनिल बेनके यांनी केले आहे . कर्नाटकात इतक्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी येणार प्रेक्षकवर्ग कुठेच नाही . यासाठी मी बेळगावकरांना धन्यवाद देतो . त्यांनी प्रत्येक सामना पाहताना प्रत्येक खेळाडूला मैदानात प्रोत्साहन दिले आहे .

बेळगाव ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष माजी आ . संजय पाटील यांनी आपल्या खास शैलीत , आ . अनिल बेनके यांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्याचे कौतुक केले . जीवनात मिळालेल्या संधीचे सोने करून जो यशस्वी होतो , तो क्रिकेटच्या मैदानात देखील सामनावीर म्हणून चमकतो . बेळगाव शहरात क्रिकेट स्पर्धा आयोजित करून बेळगावात एक स्फूर्तिदायी वातावरण निर्माण केले गेलेय . असे म्हणून त्यांनी आ . अनिल बेनके यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या .

तर क्रिकेट स्पर्धेचे आयोजक, आ . अनिल बेनके यांनी या स्पर्धेसाठी जम्मू काश्मीरपासून बेंगळुरपर्यंतचे संघ सहभागी झाल्याचे सांगितले . ते म्हणाले कि , देशाच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेसाठी खेळाडू आले होते . बेळगावच्या जनतेने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी समस्त बेळगावकरांना धन्यवाद दिले . त्याच बरोबर देशभरातून स्पर्धेसाठी आलेल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले .

यावेळी विजेत्या आणि उपविजेत्या संघातील क्रिकेटपटूंनी , आमदार अनिल बेनके यांनी या क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्तम रित्या आयोजित केल्या असून या स्पर्धेसाठी प्रेक्षकवर्ग देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने क्रिकेट खेळताना खूप प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले . पुन्हा या मैदानावर या क्रीडा स्पर्धेत खेळायला आवडेल असे मत त्यांनी व्यक्त केले .

आ . अनिल बेनके आयोजित , अनिल बेनके क्रिकेट ट्रॉफी 2023 स्पर्धेचा अंतिम सामना मोहन मोरे इलेव्हन टीम विरुद्ध झाइन संघात खेळला गेला . या अंतिम सामना मोहन मोरे संघाने जिंकला . तर उपविजेतेपद झियान संघाला मिळाले . मोहन मोरे संघाने पाच लाख रुपयांचे पहिले बक्षीस तर झाइन संघाने , अडीच लाख रुपयांचे बक्षीस पटकावले . तर ,मालिकावीर ठरलेल्या करण मोरे याने रॉयल एन्फिल्ड दुचाकी जिंकली . फरदीन काझी याला मॅन ऑफ द मॅच , बेस्ट फिल्डर म्हणून प्रसाद शिरवळकर ,तर झाइन संघातील मुन्ना शेख याची बेस्ट बॅट्समन म्हणून तर मोहन मोरे इलेव्हन संघातील प्रज्योत आंबेल्ली याला बेस्ट बॉलर म्हणून गौरवण्यात आले .

Tags: