Belagavi

संभाजी महाराज स्मारकाचे लवकरच होणार लोकार्पण

Share

धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा भव्यदिव्य स्वरूपात तसेच शोभायात्रेत कोणत्याही कमतरतेशिवाय बेळगावच्या लौकिकाला साजेसा सोहळा केला जाईल असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले,

व्हॉइस ओव्हर : छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाची बैठक समाजाच्या विविध घटकांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत बोलताना आ . अनिल बेनके यांनी ,धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा भव्यदिव्य स्वरूपात तसेच शोभायात्रेत कोणत्याही कमतरतेशिवाय बेळगावच्या लौकिकाला साजेसा सोहळा केला जाईल असे सांगितले .

बेळगावचा मानबिंदू असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. बेळगावच्या वैभवात भर घालणारे हे स्मारक शहराचे केंद्रबिंदू ठरले आहे,ह्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे, सदर लोकार्पण कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी बेळगावातील अनेक संघटनाचे प्रमुख, अभ्यासक, महनिय व्यक्ती यांची बैठक धर्मवीर संभाजी चौकात पार पडली, स्मारकाच्या कामकाजाची पाहणी करून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले, त्याचबरोबर लोकार्पण सोहळा कशाप्रकारे असावा याची रूपरेषा ठरविण्यात आली. स्मारकाच्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या संबंधित अध्ययावत सुसज्ज ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येणार आहे ,छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राच्या अभ्यासाला सदर ग्रंथालय उपयोगी पडणार आहे,

सदर कार्यक्रमास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस प्रसाद मोरे,मराठा समाजाचे नेते प्रकाश मरगाळे ,दत्ता जाधव,रमेश रायजादे, गुणवंत पाटील शहर देवस्थान अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शिवप्रतिष्ठान अध्यक्ष किरण गावडे, शहर अध्यक्ष विश्वनाथ पाटील, परशराम कोकितकर , श्रीरामसेना हिंदुस्थानाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर विश्व हिंदू परिषदचे विजय जाधव हेमंत हावळ, रामसेना जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर, नगरसेवक संतोष पेडणेकर , शंकर पाटील, जयतीर्थ सौन्दती प्रवीण पाटील संजय जाधव,विकास कलघटगी , आणिइतर उपस्थित होते .

Tags: