Belagavi

विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारज्ञान करून देण्याच्या उद्देशाने फूड फेस्टिवलचे आयोजन

Share

विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचे व्यवहारज्ञान कळावे या हेतूने बाशिबान गर्ल्स हायस्कुल मध्ये फूड फेस्टिवलचे आयोजन केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाबर मुल्ला यांनी दिली .
व्हॉइस ओव्हर : बाशिबान एजुकेशन सोसायटीच्या , बाशिबान गर्ल्स हायस्कुलच्या वतीने , फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते .

यासंदर्भात माहिती देताना मुख्याध्यापक बाबर मुल्ला यांनी सांगितले कि , शाळेतर्फे अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जात आहे . ग्राहक खरेदी आणि विक्री कसे करतात यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे . भरपूर उत्साहाने यामध्ये विद्यार्थी सहभागी झाले आहेत . अभ्यासाबरोबरच , त्यांना प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील .

प्रारंभी शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या फूड फेस्टिवल आणि ग्राहक दिन कार्यक्रमाचे उदघाटन सय्यद कबीर अहमद इनामदार यांनी केले .

या फूड फेस्टिवल मध्ये सुमारे २०० विद्यार्थिनींनी स्नॅक्स , पाणी पुरी , शेवपुरी , पावभाजी , फ्रुट सॅलड , सँडविच , कोकोनट राबडी , चिकन चिली , चिकन बिर्याणी , वडापाव आणि बरेचसे स्वादिष्ट आणि चमचमीत पदार्थ बनवून आणले होते . पालक तसेच शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी या फूड फेस्टिवल मध्ये सहभागी होऊन , पदार्थांचा आस्वाद घेतला .

या कार्यक्रमात मुजाहिद तालिकोटी , एजाज लोधी , आणि शिक्षक तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते

Tags: