रॉटव्हीलर, लॅब्रोडॉगसह 13 जातींच्या 65 श्वानांचा सहभाग
विजेत्या श्वानांचा रोख पुरस्कार, प्रमाणपत्र देऊन गौरव
ऐनापुरात पार पडला अनोखा डॉग शो !
कोण बिबट्यासारखा ऐटीत, चपळाईने धावणारा, तर कोण शिकारी कुत्रा, पांढऱ्याशुभ्र केसांचे पामेरीयन, लांडग्यांसारखे दिसणारे जर्मन शेफर्ड, तर कुठे इकडेतिकडे धावणारी गोंडस कुत्री हे सगळे दृश्य कागवाड तालुक्यातील ऐनापूर शहरात पहायला मिळाले. निमित्त होते, श्री सिद्धेश्वर देवाच्या ५३ व्या जत्रा महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या डॉग शोचे !
ऐनापूर येथे श्री. भगवान सिद्धेश्वराच्या ५३ व्या जत्रा महोत्सवानिमित्त डॉग शो आयोजित करण्यात आला होता. रॉटव्हीलर, लॅब्रोडॉग, जर्मन शेफर्ड, मुधोळ हाउंड्स, पिटबुल, पाकिस्तानी बुली यासह 13 विविध जातींचे 65 कुत्रे या शोमध्ये सहभागी झाले होते. रोख 10,001, 7,001, 5,001 आणि 3,001 रुपये बक्षिसे व प्रमाणपत्र विजेत्या डॉगीना देण्यात आली. यल्लप्पा घोरपडे यांच्या जर्मन शेफर्डला प्रथम, कार्तिक कांबळीच्या सायबेरियन हस्कीला द्वितीय, मोहन मुचंडीच्या रॉटव्हीलरला तृतीय क्रमांकासाठी, आणि विश्वा निडोणी यांच्या ग्रेटडेनने चतुर्थ क्रमांक या डॉग शोमध्ये मिळवला. विजापूर, मुधोळ, मुगळखोड, जमखंडी, तेरादाळ, गोकाक, अथणी, महाराष्ट्रातील सांगली, मिरज, इचलकरंजी, जयसिंगपूर येथील श्वानांनी या शोमध्ये सहभाग घेतला.

पीकेपीएसचे संचालक राजेंद्र पोतदार यांनी डॉग शोचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना तालुका पशु आरोग्य निमंत्रक एम.एस.हुंडेकर म्हणाले की, कुत्रे पाळणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने त्यांची चांगली काळजी घ्यावी. त्यामध्ये रॉटव्हीलर्स या कुत्र्यांचे पालन करताना स्थानिक शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या कुत्र्यांची नोंदणी करण्याची सूचना त्यांनी दिली. बाइट
डॉग शोचे समन्वयक निखिल महाजन यांनी सांगितले की, ऐनापूरचा डॉग शो हा 10 वा कार्यक्रम आहे. सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील चांगल्या जातीच्या श्वानांनी यात भाग घेतला आहे. हा शो पाहण्यासाठी हजारो श्वानप्रेमी येत असून आनंद व्यक्त करत आहेत. बाइट
डॉग शोचे जज म्हणून डॉ. अभिनंदन पाटील (ऐनापूर), डॉ. एच. व्ही. सन्नक्की (बेळगाव), डॉ. विनायक संग्रोळी (बेळगाव), डॉ. श्रीकांत गणवी (बेळगाव), डॉ. सुनिल पाटील (मंगसुळी), डॉ. सचिन सुंदगोळी (पाच्छापुर), एम. एस. हुंडेकर (अथणी) यांनी काम पाहिले. डॉग शो यशस्वी करण्यासाठी राजू खवटकोप्प, नवीन गानीगेर, राघवेंद्र कांबळे, सदाशिव कागली, निखिल महाजन, सुशील चौगुले, राजेंद्र पोतदार, हर्षवर्धन पाटील, बाहुबली पाटील, शांतीनाथ पाटील, स्वप्नील तेरदाळे यांनी परिश्रम घेतले.


Recent Comments