Belagavi

बेळगावच्या प्रिया किरमटे यांची तिळगुळ आणि फुलांपासून आकर्षक रांगोळी

Share

पुष्प रंगाची उधळणं फुलपाकळ्याची रेखिवता आणि तिळगुळाचे मिलन करून प्रिया किरमटे यांनी जवळ जवळ पाच तास मेहनत घेऊन स्वखर्चाने आपल्या छंदाचा योग साधला आहे.

प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या कलागुणांचा चाहता असतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचे छंद ही वेगवेगळे असवा. आजकालच्या धाकधूकीच्या जमान्यात आपले छंद जोपासायला वेळ कुठे आहे?असा सुर सर्वत्र आहे पण काहीही झालं तरी सवड काढून आवड पूर्ण करणारी माणसंही काही कमी नाहीत. अगदी अशाच छंद जोपासणाऱ्या प्रिया किरमटे या व्यवसायाने संगणक तज्ञ असून केळकर बाग येथे जी जी टी आय नावाचे संगणक फर्म आपले पती गुरूनाथ किरमटे यांच्या सहकार्याने चालवतात शिवाय त्यांना रांगोळी साकारण्याचा अनोखा छंद आहे. सणासुदीला त्या अवर्जून आपल्या या कलेचे आकर्षक प्रदर्शन मांडतात.

फुलांच्या झडलेल्या पाकळ्या तसं पाहिलं तर उपयोगी नसतात त्यांची जागा कचरा कुंडीत असते पण प्रिया यांच्या डोळस वृत्तीने याच पाकळ्या आकर्षणीची जागा घेतात व मनामनात कलेचं तेज जागवतात. हनुमान जयंती असो , राम नवमी असो अथवा असो मकर संक्रांत सौ. कियमटेच्या हातांनी घडलेली रांगोळीतील सजीवता पाहून सगळेच पडतात प्रेमात. पुष्प रंगाची उधळणं फुलपाकळ्याची रेखिवता आणि तिळगुळाचे मिलन करून प्रिया किरमटे यांनी जवळ जवळ पाच तास मेहनत घेऊन स्वखर्चाने असा आपल्या छंदाचा योग साधला आहे.


सदर रांगोळी स्वामी विवेकानंद चौक मारूती मंदिर येथे साकारली असून चार किलो फुलांच्या पाकळ्या अर्धा किलो तिळगूळ व क्राफ्ट पेपरचा उपयोग करून ही रांगोळी काढली असून एका व्यावसायिक महिलेने साधलेला हा साधनेचा योग म्हणजे अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. प्रिया किरमटेंच हिंदू सणानिमित्त असलेले प्रेम आणि आदर यातून व्यक्त होताना दिसतो आहे.

Tags: