पकड…पकड त्याला सोडू नको’ असे म्हणत टोलनका कर्मचाऱ्यांनी चोराला फिल्मी स्टाईलमध्ये पकडण्याची धडपड केली. मात्र ती अयशस्वी ठरल्याची घटना विजापूरच्या कसबा टोलनाक्याजवळ घडली.
सँट्रो कारमधून इलकलहून निघालेल्या चोरट्याला टोलनाक्याजवळ अडवण्यात आले. त्यानंतर चोरट्याने कारमधून खाली उतरून चाकू दाखवत टोलनाका कर्मचाऱ्यांनाच धमकावले. चेहऱ्यावर मास्क लावून आलेल्या चोरट्याची गाडी थांबवण्याची सूचना इलकल पोलिसांनी केली होती. चोरट्याने टोलनाका कर्मचाऱ्यांना धमकावून 4 किमी पळ काढला. चोरट्याने कार घटनास्थळीच सोडून पळ काढला. कारमध्ये चोरीची बॅग, चाकू आणि कात्री सापडली. बॅगेत चोरीचे सोने-चांदी असल्याचा संशय आहे. दरम्यान, चोराची कार, बॅग इलकल पोलिसांनी जप्त केली आहे. केए 01 एमसी 0973 क्रमांकाची ही कार अन्सारी नामक व्यक्तीच्या नावावर आहे. ही कार चोरलेली आहे, की तोच चोर तिचा मालक हे स्प्ष्ट झालेले नाही. सध्या इलकल पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. ही घटना विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments