Belagavi

बेळगाव रोटरी आयोजित मिसेस बेळगावच्या मानकरी ठरल्या अमृता रायबागी

Share

बेळगावच्या रोटरी अन्नोत्सवामध्ये ,रोटरी मिसेस बेळगाव हा ‘किताब अमृता रायबागी यांनी पटकावला . मिसेस गॅलॅक्सी चाहत दलाल यांनी मिसेस बेळगावचा मानाचा मुकुट, अमृता रायबागी याना बहाल केला . रोटरीने दिलेल्या संधींमुळेच आपण मिसेस बेळगावची मानकरी ठरल्याचे मत अमृता रायबागी यांनी व्यक्त केले .

उत्तर कर्नाटकात , बेळगाव रोटरी अन्नोत्सव खूप प्रसिद्ध झाला आहे . दरवर्षी बेळगाव आणि बेळगाव बाहेरील लोक या अन्नोत्सवाची वाट पाहत असतात . यंदा नानावाडी येथील अंगडी मैदानावर या अन्नोत्सवाचे आयोजन करून देखील , खवय्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला . दररोज हजारो खवय्यांनी या रोटरी अन्नोत्सवाला भेट देऊन आपल्या आवडीच्या पदार्थांवर ताव मारला . मागील शुक्रवार पासून सुरु झालेल्या या अन्नोत्सवामध्ये , दररोज १० ते १५ हजार लोक भेट देत आहेत . अन्नोत्सवात रोटरीतर्फे रोज विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत .
शनिवारी देखील महिलांसाठी खास पाककला स्पर्धा तसेच फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते . या सर्व कार्यक्रमात बेळगाव महिलांनी उत्साहात भाग घेतला .

या फॅशन शो साठी मिसेस गॅलॅक्सी चाहत दलाल , आ . अभय पाटील , तसेच अभिनेत्री सई लोकूर आदी उपस्थित होते .
फॅशन शो मध्ये , साडी थीम , बॉलिवूड थीम , रॅम्पवॉक , आदीचे सादरीकरण अतिशय उत्तम रित्या करण्यात आले .

मिसेस गॅलॅक्सी चाहत दलाल यांनी विजेतेपद घोषित करून अमृता रायबागी याना मानाचा मुकुट प्रदान केला .
यावेळी चाहत दलाल यांनी रोटरी कडून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करून त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याने धन्यवाद दिले . अन्नोत्सवाबरोबरच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रोटरीच्या या कार्याची प्रशंसा केली .

त्याचप्रमाणे रोटरी मिसेस बेळगाव चा ‘किताब पटकावलेल्या अमृता रायबागी यांनी आपला आनंद यावेळी व्यक्त केला . त्याचप्रमाणे रोटरीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले . यामुळे आपला आत्मविश्वास आणखी वाढल्याचे त्या म्हणाल्या

त्याचप्रमाणे रोटरीचे पदाधिकारी मनोज मायकल यांनी रोटरी कडून केल्या जात असलेल्या सामाजिक कार्याचा यावेळी आढावा घेतला . अन्नोत्सव आयोजित करून मिळणाऱ्या नफ्यातून बेळगावमध्ये महिलांसाठी सार्वजनिक शौचालये तसेच बस शेड निर्माण केली जात असल्याचे त्यांनी सांगितले . शिवाय विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जात आहेत . बेळगावकरांसहित अन्य राज्यातील लोकांचा देखील भरभरून प्रतिसाद लाभत आहे आणि यापुढेही लाभावा असे ते म्हणाले .

एकंदरीत बेळगाव रोटरी कडून आयोजित केलेल्या अन्नोत्सवात विविध खाद्यपदार्थांबरोबरच , येणाऱ्या लोकांचे मनोरंजन , विविध स्पर्धा ,आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धा यामुळे या अन्नोत्सवाची लज्जत आणि रंगत अधिकच वाढली आहे .

Tags: