संक्रांत सणासाठी ,तिळगुळ खरेदी करण्यासाठी बेळगाव बाजारपेठेत ग्राहक गर्दी करू लागले आहेत .शहरात मुख्य बाजारपेठेसहित अनेक ठिकाणी तिळगुळाची दुकाने थाटण्यात आली आहेत .
यंदा 15 जानेवारीला संक्रांत आहे . हा सण तिळगुळ वाटून साजरा करतात . कोणत्याही नात्यातील कटुता संपवून , त्या नात्यात गोडवा निर्माण करण्याचा आणि नात्यातील गोडवा अधिक वाढवणारा असा हा सण साजरा करण्यासाठी तिळगुळ महत्वाचा मनाला जातो . वास्तविक १४ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण सुरु होते . या काळात थंडी असते आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि स्निग्धता राखण्यासाठी तीळ हा महत्वाचा घटक असल्याने संक्रांतीला तिळगुळ दिला जातो .
बेळगाव बाजारपेठेत तिळगुळसहीत , लहान मुलांसाठी तिळगुळ वाटण्यासाठी रंगबिरंगी आकर्षक असे विविध आकारातील डबे , तसेच तिळाचे लाडू , हलवा तसेच लहान मुलांना बोरन्हाण घालण्यासाठी हलव्याचे आकर्षक दागिने विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत .
शहरातील पांगुळ गल्ली येथील विक्रेत्या , संगीता रेडेकर यांनी सांगितले कि , आमच्याकडे तिळगुळ , हलव्याचे दागिने , तिळगुळ वाटण्यासाठी डबे , तिळाचे लाडू सर्व काही उपलब्ध आहे .
तर खरेदीसाठी गणेशपूर येथून आलेल्या सविता जोते यांनी सांगितले कि , संक्रांत सण आम्ही खूप चांगल्या प्रकारे साजरा करतो . बाजारात खूप प्रकारचे तिळगुळ , लाडू विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत . पहिल्या पासून चालत आलेल्या रूढी आणि परंपराचे आपण पालन केले पाहिजे . तिळगुळ सर्वांशी गोड बोलण्याचा आणि प्रेमाने रहाण्याचा संदेश देतो असे त्या म्हणाल्या .
शाळेच्या विद्यार्थिनी देखील तिळगुळ खरेदी करताना दिसत होत्या . एकंदर संक्रात सणासाठी तिळगुळ खरेदी करण्यासाठी बेळगावची बाजारपेठ फुलू लागली आहे .


Recent Comments