Belagavi

संगोळी उत्सव राज्यस्तरीय उत्सव बनू द्या : आमदार महांतेश कौजलगी

Share

संगोळी रायण्णा यांचा प्रामाणिकपणा, देशभक्ती, तरुणांनी आपल्या जीवनात अंगीकारली पाहिजे. संगोळी रायण्णा उत्सव येत्या काही दिवसांत राज्यस्तरीय उत्सवात रूपांतरित होणार आहे.असे बैलहोंगल विधानसभा मतदारसंघाचे आमदार महांतेश कौजलगी म्हणाले.

बेळगाव जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतिवीर संगोळी रायण्णा उत्सव-२०२३ च्या कार्यक्रमात ते बोलत होते .
क्रांतिवीर संगोळी रायण्णा उत्सव हा केवळ सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम नाही. रायण्णा उत्सवात सहभागी होऊन संगोळी रायण्णाना आदरांजली वाहण्याचा मानस असल्याचे यांनी सांगितले.

रायण्णाच्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी संगोळी मध्ये सुमारे 13 कोटी रुपये खर्चून रायण्णा रॉक गार्डन तयार करण्यात आले आहे. अशातच संगोळी रायण्णा सैनिक शाळेचे बांधकाम करण्यात आले असून, शाळेत प्रवेश सुरू झाले आहेत, असे आमदार महांतेश कौजलगी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला खा . मंगला अंगडी , संगोळी हिरेमठ संस्थानचे श्री गुरुलिंग शिवाचार्य स्वामीजी, कित्तूर संस्थान कलमठचे राजगुरु श्री मडीवाळ राजा योगेंद्र महास्वामी, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, एम.नागराज, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील, बैलहोंगल उपविभागीय अधिकारी शशिधर बगली, तहसीलदार बसवराज नागराळ, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री आदी कार्यक्रमात उपस्थित होते. बैलहोंगल उपविभागीय अधिकारी शशिधर बगली यांनी स्वागत केले.

Tags: