Belagavi

कडोलीत सौंदत्तीला गेलेल्या यल्लमा भाविकांचा सामूहिक पडल्या भरण्याचा कार्यक्रम

Share

कडोली येथील आमराईत महालक्ष्मी देवीच्या गदगेजवळ देवस्की कमिटी , हक्कदार कमिटी,भाविक तसेच ग्रामस्थांतर्फे विधिवत पुजनाने सामूहिक पडल्या भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

येत्या काळात गावच्या धार्मिक कार्यासाठी गावची छत्तिस एकर जागा असुन देखील हक्काची म्हणुन जागाच शिल्लक राहणार नसणार यामुळे देवस्कि कमिटी,हक्कदार कमिटी,भाविक भक्त व ग्रामस्थांतर्फे गावच्या धार्मिक कार्यासाठी जागा राखून ठेवण्यासाठी ग्राम पंचायत व जिल्हाधिकार्यांना मागणी करण्याचा ठरावही यावेळी करुन देवीकडे साकडे घालण्यात आले.
सालाबादाप्रमाणे सवदत्ती यल्लमा देवीची शाकंभरी पौर्णिमेची यात्रा झाल्यानंतर गावामध्ये पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला .

यंदा कोरोना निर्बंध नसल्याने , गावातून शेकडो भाविक सौंदत्ती यल्लमा यात्रेला गेले होते . तिथून गावात परतल्यावर, गावात पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला .

गावच्या ग्राम पंचायतीची जागा तब्बल छत्तीस एकर असुन यापैकी सरकारी शाळा कॉलेज , , दवाखाना , तसेच विविध सरकारी कार्यालये, संघसंस्थांना याआधीच देण्यात आली असुन आता शिवाजी मैदानावर स्टेडियम बांधण्यासाठी शासनाकडुन गेल्या पाच वर्षामागेच मंजूर झाली असून असुन उर्वरीत जागाही शिल्लक राहणार नाही तरी ग्राम पंचायत व जिल्हाधिकारी यानीं याची नोंद घेऊन निदान दोन एकर तरी या यात्रेसाठी राखून ठेवण्याची मागणी धनजंय कटांबळे यांनी यावेळी केली .

या धार्मिक कार्यक्रमासाठी गावातील यल्लमा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: