Belagavi

देहरादूनच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश

Share

शोतोकन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देहरादून (उत्तराखंड) येथे झालेल्या पाचव्या ओपन इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप-2022 मध्ये बेळगावच्या कराटेपटूंनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण आणि कांस्य पदके पटकावली आहेत.

शोतोकन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन इंडियाच्या वतीने उत्तराखंड राज्यातील देहरादून येथे नुकतीच पाचवी ओपन आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा-2022 पार पडली. या कराटे स्पर्धेत शोतोकन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन इंडियाच्या विजयनगर, हिंडलगा येथील शाखेच्या कराटेपटूंनी चमकदार कामगिरी केली.

या स्पर्धेत यश शंकर मेणसे, योगेश कल्लाप्पा चलवेटकर, अमित गौडाप्पा पाटील, वर्धन संतोष लाड, ओमकार उत्तम शिंदे, संचित तानाजी कवठणकर, प्रेमजीत भारत भिलवडे, सूरज बलराम गुरव यांनी कुमीते प्रकारात सुवर्णपदक तर काता प्रकारात कांस्यपदक पटकावले. तर श्रेयस विनोद कडोलकर याने कुमीते प्रकारात कांस्य तर काता प्रकारात सुवर्णपदक मिळवले. श्रेयस कुंडेकर याने काता आणि कुमीते या दोन्ही प्रकारातही प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. श्रीशैल कुंडेकर याने कुमीते प्रकारात कांस्य तर काता प्रकारात सुवर्णपदक मिळवले.

प्रमुख पाहुणे गोरखा सुधार सभेचे अध्यक्ष पदमसिंह थापा आणि उत्तराखंडच्या माजी राज्यमंत्री आणि अखिल भारतीय गोरखा मोर्चाच्या अध्यक्षा सारिका प्रधान यांच्याहस्ते विजेत्या कराटेपटूंना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. हे सर्व कराटेपटू कराटे प्रशिक्षक भरमानी मल्लाप्पा पाटील (चलवेनहट्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली एसकेएसए विजयनगर, हिंडलगा शाखेत सराव करत आहेत.

Tags: