आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानमंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज गुरुवारी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री राजमाता को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रतिभा संजय नेगिनहाळ उपस्थित होत्या. यावेळी ‘मी जिजाऊ बोलते’ या विषयावर एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचे व सर्व स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापीका सौ. अलका जाधव यांचे स्वागत पर भाषण झाले.

यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी जिजामाता आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून स्पर्धेमध्ये भाग घेतला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भक्ती मनोहर देसाई यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेतील प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका फरीदा मिर्झा व सर्व शिक्षक वर्ग यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शितल पाटील यांनी केले. फरीदा मिर्झा यांनी आभार मानले.


Recent Comments