Belagavi

बेळगावात काँग्रेसच्या प्रजाध्वनी बस यात्रेला प्रारंभ

Share

भाजप हटाओ देश बचाओ’चा नारा देत बेळगावातील टिळकवाडीतील काँग्रेस विहीर विरसौधपासून बुधवारी काँग्रेसच्या प्रजाध्वनी बस यात्रेला प्रारंभ करण्यात आला.

केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या यात्रेचे उद्घाटन केले, यावेळी काँग्रेसचे राज्य आणि जिल्हास्तरीय नेते उपस्थित होते.
99 वर्षांपूर्वी 1924 मध्ये बेळगावात तत्कालीन काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. महात्मा गांधींनी काँग्रेसच्या या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध तीव्र लढा देण्याची शपथ वेळगावातील या ऐतिहासिक विरसौधमध्ये घेण्यात आली होती.

Tags: