विणकर समाजाचे आद्य दैवत देवांग देवल महर्षी यांच्या नावे बेळगावातील ओल्ड पी. बी. रोडवर महाद्वार उभारणीच्या कामाची कोनशिला आज बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्याहस्ते बसविण्यात आली.
बेळगावातील खासबाग, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव भागात विणकर देवांग समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे विणकर समाजाचे आद्य दैवत देवांग देवल महर्षी यांच्या नावे ओल्ड पी. बी. रोडवर प्रमुख ठिकाणी महाद्वार उभारावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्याची दखल घेऊन आ. अभय पाटील यांनी शब्द दिल्याप्रमाणे दोनच महिन्यात या कामाला शासकीय मंजुरी मिळवून घेतली. त्यानुसार आज मंगळवारी त्यांच्याचहस्ते महाद्वार उभारणीसाठी पूजन करून विधिपूर्वक कोनशिला बसविण्यात आली.

या संदर्भात आपली मराठी सोबत बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, विणकर समाजाच्या अनेक मागण्यांपैकी ही एक मागणी होती. त्यासाठी पाठपुरावा करून सुमारे 50 लाख रुपये खर्चातून देवांग देवल महर्षी यांच्या नावे महाद्वार उभारणीसाठी आज कोनशिला बसविण्यात आली आहे. येत्या एक-दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल. विणकर समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी सहानुभूतीने विचार करून त्या पूर्ण करून विणकर समाजाच्या कल्याणासाठी अनेक योजना जारी केल्या आहेत. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कर्नाटक राज्य वस्त्रोद्योग विकास निगमचे उपाध्यक्ष सुरेश कित्तूर म्हणाले, विणकर समाजाचे आद्य दैवत देवांग देवल महर्षी यांच्या नावे ओल्ड पी. बी. रोडवर प्रमुख ठिकाणी महाद्वार उभारावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्याची दखल घेऊन आ. अभय पाटील यांनी शब्द दिल्याप्रमाणे अवघ्या दोनच महिन्यात या कामाला शासकीय मंजुरी मिळवून घेऊन कामालाही प्रारंभ केला आहे. लवकरच हे काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
यावेळी माजी नगरसेवक रमेश सोनटक्की व इतरांनी आ. अभय पाटील यांचे आभार मानले. यावेळी विणकर समाजातर्फे आ. अभय पाटील यांचा शाल, पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विणकर समाज प्रमुख शंकर बुचडी, किशोर बडगावी, एम. पी. बंगोडी, बसवराज उपरी, बसू ढवळी, मनु नंदीकोळ, वेंकटेश वनहळ्ळी यांच्यासह विणकर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments