Belagavi

रोटरी अन्नोत्सवामध्ये प्रख्यात शरीरसौष्ठवपटू अनुजकुमार यांनी दाखवले प्रात्यक्षिक

Share

बेळगाव मध्ये आयोजित रोटरी अन्नोत्सवामध्ये , सोमवारी चौथ्या दिवशी रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित नितीन शिरगुरकर पुरस्कृत मिस्टर टॉप 10 आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच मिस्टर रोटरी टॉप 10 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .

रोटरी अन्नोत्सवात विविध खाद्य पदार्थांबरोबरच दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे . सोमवारी , सोमवारी चौथ्या दिवशी रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित नितीन शिरगुरकर पुरस्कृत मिस्टर टॉप 10 आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच मिस्टर रोटरी टॉप 10 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून , आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शरीसौष्ठवपटू अनुजकुमार उपस्थित होते . त्यांनी आपल्या भारदस्त पिळदार शरीराचे प्रदर्शन करून उपस्थित तरुणांना प्रोत्साहन दिले .

त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरील फिटनेस ऍथलिट केतकी पाटील हिने देखील प्रात्यक्षिक दाखवले .
आपल्या कमावलेल्या पिळदार शरीराबद्दल आणि तरुणाईला शरीरसौष्ठवासाठी प्रोत्साहन देताना अनुजकुमार यांनी सांगितले कि , तरुणांनी वाईट व्यसनापासून दूर राहावे . धूम्रपान , नशिले पदार्थापासून दूर रहा . तुम्ही मोटिव्हेशनल व्हिडीओ पहा . इंटरनॅशनल खेळाडूंचे व्हिडीओ पहा तुम्हाला प्रेरणा मिळेल . पुन्हा बेळगावला यायची संधी मिळाली तर आपण नक्कीच भेटू असे ते म्हणाले .

त्याचप्रमाणे अजित सिद्धण्णावर यांनी सांगितले कि ,आज रोटरी अन्नोत्सवात , जिल्हास्तरीय मिस्टर रोटरी आणि आंतरमहाविद्यालयीन मिस्टर टॉप 10 स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . या स्पर्धेसाठी 150 स्पर्धक सहभागी झाले आहेत , आणि महाविद्यालयाचे 40 शरीरसौष्ठवपटू विध्यार्थी सहभागी झाले आहेत . आर्मीचे सुभेदार तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठवपटू अनुजकुमार तसेच अंतरारराष्ट्रीय पातळीवरील मॉरल फिटनेस ऍथलिट केतकी पाटील देखील या दरम्यान आपले प्रात्यक्षिक दाखवणार आहेत .ही स्पर्धा पाहायला आज प्रचंड गर्दी उसळली आहे . यावेळी त्यांनी रोटरीच्या कार्याला सपोर्ट करा असे सांगितले .

मिस्टर रोटरी टॉप 10 – आंतरमहाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत लिंगराज महाविद्यालयाच्या व्ही बी किरण याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मिस्टर टॉप 10 चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा ‘किताब पटकावला . यावेळी रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते .

Tags: