धारवाडच्या आदित्य पार्कमधील रहिवाशांनी मुलभूत सुविधांच्या मागणीसाठी रास्ता रोको करून आंदोलन केले.

आदित्य पार्कमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली असून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.
मात्र, एकाही लोकप्रतिनिधीने रहिवाशांच्या समस्येला प्रतिसाद न दिल्याने तात्काळ आदित्य पार्कमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी जनतेने केली.
आदित्य पार्कमधील रहिवाशांनी रास्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. धारवाड उपनगर पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांचे मन वळविण्याचे काम केले.


Recent Comments