विजापूर शहरातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशन सोसायटीच्या श्री रवींद्रनाथ टागोर शाळेत फूड फेस्ट आयोजित करण्यात आला होता.
या फूड फेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची विक्री करून आनंद व्यक्त केला. मुलांनी समोसे, भजी , व्हेज बिर्याणी, मसाला भात, चुरुमुरी, कांदापोहे , , गाजर हलवा, चकली , रव्याचे लाडू , यासह तोंडाला पाणी आणणारे पदार्थ बनवले. एका अनुभवी व्यावसायिकाप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विकून आणि नफा कमवून त्यांनी उत्सव साजरा केला. शालेय व्यवस्थापन मंडळाने मुलांमध्ये व्यवसाय आणि नफा याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी असा अनोखा कार्यक्रम आखला होता. त्यानुसार मुलांनी पालकांच्या मदतीने विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून शाळेच्या आवारात तात्पुरत्या स्वरूपात उघडलेल्या दुकानांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री केली.

शाळेच्या आवारात चार- चार विद्यार्थ्यांनी मिळून , 80 पेक्षा जास्त दुकाने थाटून व्यवसाय केला. हॉटेल स्टाईल आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांप्रमाणे व्यवहार केला . दुपारी 4 वाजता सुरू झालेला खाद्य मेळा सायंकाळी 7 वाजता संपला.विद्यार्थ्यांचे पालक, त्यांचे नातेवाईक, विद्यार्थी आणि जनतेनेही खाद्यपदार्थांची खरेदी करून आनंद लुटला. मुलांनीच तयार केलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थांचाही मुलांनी आस्वाद घेतला. मुलांमध्ये व्यावसायिक ज्ञान वाढवण्यासाठी आयोजित केलेल्या फूड फेस्टचे पालकांनी कौतुक केले .

ज्या विद्यार्थ्यांनी चांगला व्यवसाय आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार केले त्यांच्यासाठी बक्षिसे जाहीर करण्यात आली. फूड फेस्ट मुळे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक ज्ञानाची पातळी वाढली आणि पालकांना त्यांच्या मुलांची व्यावसायिक कौशल्ये पाहून आनंद झाला.


Recent Comments