Belagavi

बेळगावात ‘वेदांत एक्सेलन्सी अवार्ड’ प्रदान सोहळा

Share

बेळगावातील वेदांत फौंडेशनच्या वतीने आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा ‘वेदांत एक्सेलन्सी अवार्ड’ देऊन गौरव करण्यात आला.

कणबर्गी येथील महेश फौंडेशनच्या सभागृहात आज शनिवारी झालेल्या शानदार समारंभात पोलीस, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना ‘वेदांत एक्सेलन्सी अवार्ड’ प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथचे अध्यक्ष अशोक नाईक, समृद्धी सेवा संघाचे सचिव विरेश किवडसन्नवर, समाजसेवक श्रीकांत आजगावकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिक्षक ईश्वर पाटील, सविता चंदगडकर, एन. डी. मादार, दै. तरुण भारतच्या पत्रकार मनीषा सुभेदार, द हिंदूंचे ऋषिकेश बहादूर देसाई, विजय कर्नाटकचे महेश विजापुरे, पोलीस श्रीधर तळवार, यल्लाप्पा मुनवळ्ळी आणि आण्णाप्पा यरगुडे यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अनाथ आणि विशेष मुलांसाठी कार्य करणारे महेश फौंडेशनचे महेश जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


यावेळी बोलताना वेदांत फौंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी फौंडेशनच्या कामाची माहिती दिली. समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे आवश्यक आहे या हेतूने वेदांत फौंडेशनतर्फे गेली २ वर्षे हा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना डीडीपीआय बसवराज नलतवाड यांनी, वेदांत आणि महेश फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. ते वेदांत फौंडेशन करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बाईट
यावेळी किशोर काकडे यांचे विशेष व्याख्यान झाले. याप्रसंगी वेदांत फौंडेशनच्या सचिव आस्मा नाईक, सुनील देसूरकर, बीईओ रवी बजंत्री आदी उपस्थित होते.

Tags: