खवय्यांसाठी पर्वणी असलेल्या रोटरीचे अन्नोत्सव २०२३ चे खा . मंगला अंगडी यांच्या हस्ते थाटात उदघाटन पार पडले . २०० हुन अधिक खाद्यपदार्थ , गृहोपयोगी वस्तू , कपडे ,चप्पल हे एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहात . पहिल्याच दिवशी ग्राहकांचा या अन्नोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला .
रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सव २०२३ चे शुक्रवारी खा . मंगला अंगडी यांच्या हस्ते थाटात उदघाटन पार पडले . सावगाव रोड ,नानावाडी येथील अंगडी कॉलेजच्या मैदानावर ह्या अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . फीत कापून मान्यवरांनी या अन्नोत्सवाचे उदघाटन केले . त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले .

रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे , यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या सदस्यांचे कौतुक करत इतका मोठा इव्हेन्ट भरवल्याबद्दल आनंद व्यक्त केला . इव्हेन्ट चेअरमन पराग भंडारी यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला . गेल्या अनेक वर्षांपासून रोटरी कडून अन्नोत्सवाचे आयोजन केले जात आहे . देशातील विविध राज्यातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात येतात . शाकाहारी , मांसाहारी , स्टार्टर्स ,त्याचप्रमाणे गृहोपयोगी वस्तू , मनोरंजनासहित , मुलांसाठी खेळ असे २०० हुन अधिक स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत . फक्त बेळगावचेच नाही तर मुंबई , नाशिक ,पुणे , सातारा ,कोल्हापूर , बेंगळूर , तुमकूर , गुजराथ , आणि अन्य ठिकाणचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे लावण्यात आले आहेत . ग्राहकांचा खूप छान प्रतिसाद लाभत आहे . या अन्नोत्सवातून मिळणार नफा समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्यात येतो अशी माहिती पराग भंडारी यांनी दिली .
खा . मंगला अंगडी यांनी या अन्नोत्सवाला शुभेच्छा दिल्या . यावेळी , अरिहंत हॉस्पिटलचे संचालक डॉ . एम डी दीक्षित , उत्तम पाटील , कर्नल शमविजय सिम्हा , केमको कंपनीचे वैभव सर्वोजी , यांचा सत्कार करण्यात आला .
विविध प्रकारचे स्टॉल्स , आकर्षक मांडणी , शाकाहारी , मांसाहारी , मत्स्याहारी शिवाय विविध प्रकारची स्टार्टर्स , महिलांच्या वस्तूंचे स्टॉल्स, गृहोपयोगी वस्तू , लहान मुलांसाठी , जायंट व्हील , आणि इतर खेळ असल्याने , ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे .
यावेळी रोटरीचे प्रांतपाल , व्यंकटेश देशपांडे, माजी प्रांतपाल अविनाश पोतदार , मनोज हुईलगोळ , उमेश सरनोबत , सुभाष चांडक , आनंद सराफ , नितीन शिरगुरकर , मिलिंद पाटणकर , राजू पोतदार , डॉ . शशिधर शेट्टी , डॉ . विजय देसाई , आणि इतर सदस्य उपस्थित होते .


Recent Comments