Dharwad

माजी मुख्यमंत्री सिद्धू यांना जग्गेश यांचा टोला

Share

जे शहाणे आणि समजूतदार असतात, त्यांच्या तोंडी अपशब्द येत नाहीत. उलट ज्यांना आपल्या हातून काही होणार नाही, असा विचार ज्यांच्या मनात आहे आणि लाचार आहे, तेच वाईट बोलतात असा टोला राज्यसभा सदस्य आणि अभिनेते जग्गेश यांनी माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांना लगावला.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची तुलना कुत्र्याच्या पिलाशी केल्याबद्दल राज्यसभा सदस्य आणि अभिनेते जग्गेश यांनी धारवाडमध्ये प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. जे समजुतदार आणि जाणकार आहेत ते अपशब्द वापरत नाहीत. पण, ज्यांच्या मनात द्वेष आहे, ते आपला राग शब्दांतून दाखवतात. त्याचा उपयोग होणार नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर कोणते मोठे काम केले आहे, हे सर्वसामान्यांना माहीत आहे. त्यामुळे सिद्दरामय्या यांच्या शब्दाला किंमत देण्याची गरज नसल्याचे जग्गेश यांनी सांगितले.

Tags: