पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बेळगावजवळील हत्तरगी टोल नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी बर्निंग बसचा थरार पहायला मिळाला. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बसला अचानक आग लागून बस पूर्णपणे जळून खाक झाली.
कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला गुरुवारी संध्याकाळी अचानक आग लागली. हुक्केरी तालुक्यातील हंचीनाळ क्रॉसजवळील गुलाबशावली दर्ग्याजवळ पूना बंगलोर राष्ट्रीय 4 वर जात असताना अचानक आग लागली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बसमधून खाली उतरून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, तांत्रिक बिघाडामुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बसला लागलेली आग विझवली. मात्र तोवर बस पूर्णपणे जळून खाक झाली. यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे सीपीआय रमेश छायागोळ व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments