विजापूर शहरातील ज्ञानयोगाश्रमात बुधवारी रात्री श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या अस्थी संकलन करण्यात आले.
पाच मडक्यांमध्ये स्वामीजींच्या अस्थी जमा करण्यात आल्या. ज्ञानयोगाश्रमाचे अध्यक्ष श्री. बसवलिंग स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली अस्थींचे संकलन करण्यात आले.
आधी एका मोठ्या मडक्यात अस्थी व राख गोळा करण्यात आली. पहाटे ब्राह्म मुहूर्तावर चिताभस्म जमा करण्यात आले. यावेळी स्वामीजी व भक्तगण उपस्थित होते.


Recent Comments