चालता-बोलता देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या अस्थी एका महासागरात, चार नद्यांमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती बसवलिंग स्वामीजी यांनी दिली.
सिद्धेश्वर स्वामीजी यांच्यावर काल त्यांच्या इच्छेप्रमाणे दहनविधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर ज्ञानयोगश्रम येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बसवलिंग स्वामीजी म्हणाले की, सिद्धेश्वर स्वामीजींचा अंतिम संस्कार कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला, आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोकांना त्यांचे अंतिम दर्शन मिळाले. सरकार, स्वयंसेवी संस्थानी यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यापैकी काहींनी आलेल्या भक्तांसाठी स्वेच्छेने घरी स्वयंपाक केला आणि भरपूर फळे वाटली. त्या सर्वांचे मी आभार मानतो. चांगले काम केल्याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांचेही आभार मानले. अंत्यसंस्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह अनेक लोकप्रतिनिधी आणि नेते सहभागी झाले होते. पक्षीय मतभेद विसरून सर्व नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा आश्रम पक्षनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष म्हणून वाढला आहे.
या कार्यक्रमात सत्तूर मठ, कणेरीमठ, आदी चुंचनगिरीच्या मठाधिपतींसह अनेक मठाधिपती सहभागी झाले होते. कणेरी स्वामीजींनी चिता भस्म आम्ही देऊ असे म्हणाले होते. परंतु एक महासागर आणि चार नद्यांमध्ये अस्थी सोडण्याचा विचार आहे. भक्त भस्म (विभूती) घेऊन ते लावू शकतात. त्यांनी स्वामीजींचे ग्रंथ घ्यावेत आणि ते आपल्या पाठीशी आहेत हे जाणून घ्यावे. आश्रमाच्या जबाबदारीबाबत समिती यापुढेही चर्चा करेल, असे बसवलिंग स्वामीजींनी स्पष्ट केले. बाईट


Recent Comments