Belagavi

बेळगावात गाणिग समाजातर्फे कॅण्डल मार्च काढून सिद्धेश्वर स्वामीजींना आदरांजली

Share

बेळगावात गाणिग समाज अभिवृद्धी संघातर्फे सिद्धेश्वर स्वामीजींना मंगळवारी सायंकाळी कॅण्डल मार्च काढून आदरांजली वाहण्यात आली.

गाणिग समाज अभिवृद्धी संघातर्फे मंगळवारी सायंकाळी बेळगावातील गणपत गल्ली, खडेबाजार कॉर्नर धनशेट्टी मल्लाप्पा चौकापासून कॅण्डल मार्च काढून विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमचे श्री सिद्धेश्वर स्वामीजींना आदरांजली वाहण्यात आली. गाणिग समाजाचे नागरिक हातात मेणबत्त्या घेऊन या फेरीत सहभागी झाले होते. त्यानंतर मारुती गल्ली, रामदेव गल्ली, खडेबाजारमार्गे फिरून गणपत गल्ली कॉर्नर येथे फेरीची सांगता झाली.

या कॅण्डल मार्चमध्ये गाणिग समाज अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष प्रकाश बाळेकुंद्री, रमेश उटगी, महादेव सिद्दण्णावर, मल्लान्ना सिद्दण्णावर, वसंत मुतगेकर, सुजय बाळेकुंद्री, रवींद्र काकती, संजय बाळेकुंद्री, सतीश बाळेकुंद्री, आनंद बागेवाडी, मंगला सिद्दण्णावर, ललिता मुतगेकर यांच्यासह सुमारे गाणिग समाजाच्या 200 हुन अधिक स्त्री-पुरुषांनी या मार्चमध्ये सहभाग घेतला.

Tags: