बेळगावच्या खानापूर रस्त्यावर, पिरणवाडी येथे कालपासून पेट्रोल न मिळाल्याने वाहनधारकांचे हाल झाले आहेत.
शहरातील व्ही आर आंबले पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याने , वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, या पेट्रोल पंपावर दररोज शेकडो वाहने येत असतात मात्र वाहनधारक पेट्रोल न मिळाल्याने त्यांना परत जावे लागत आहे अशी परिस्थिती निर्माण झाले आहे .

कालपासून याठिकाणी पेट्रोल मिळत नसल्याने स्थानिक व परिसरातील जनता हैराण झाली आहे . पेट्रोलचा पुरवठा होत नाहीय . नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पेट्रोल पंप मालकांनी केले आहे.
सर्वसाधारणपणे वाहनांसाठी पेट्रोल महत्त्वाचे आहे,. पेट्रोल कंपनीकडून पेट्रोलचा पुरवठा बंद करण्यात आले आहे . कंपनीकडून पुरेसे पेट्रोल उपलब्ध होताच त्याचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.


Recent Comments