विजापुरात चालता-बोलता देव मानले जाणारे सिद्धेश्वर स्वामी लिंगैक्य झाले आहेत. त्यांच्या पार्थिव देहावर चंदनाची लाकडे वापरून अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु आहे.
सिद्धेश्वर स्वामीजींच्या अंत्यसंस्काराची विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमात आज मंगळवारी जोरात तयारी सुरू आहे. बागलकोट जिल्ह्यातील हुल्याळ येथील चंदनाची लाकडे आश्रमात आणण्यात आली आहेत.
गुरुदेव आश्रमाचे स्वामीजींचे शिष्य श्री हर्षानंद महास्वामी यांच्या आश्रमात उगवलेली चंदनाची लाकडे यासाठी आणण्यात आली आहेत. आज संध्याकाळी सर्व विधी करून अग्निसंस्कार केले जातील.


Recent Comments