चालता-बोलता देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या निधनानंतर त्यांचा पार्थिव देह विजापूर शहरातील सैनिक शाळेच्या आवारात ठेवण्यात आला आहे. श्रींच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक येत आहेत. यावेळी स्वामीजींच्या पार्थिवावर उडणारी धूळ रोखण्यासाठी मंत्री श्रीरामुलू यांनी स्वतः मॅट घातल्याची घटना घडली
कर्नाटक आणि अन्य राज्यातून लाखो भाविक स्वामीजींच्या अंत्यदर्शनासाठी विजापुरातील सैनिक शाळेला भेट देऊन त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहेत. श्रींच्या नश्वर देहासमोर धूळ उडत होती. स्टेजसमोर मॅट नीट पसरली नसल्याने भाविकांच्या चालताना धूळ उठत असल्याचे पाहून परिवहन मंत्री श्रीरामुलू यांनी स्वत: रांगेत येऊन धूळ उठू नये म्हणून मॅट घातली. यावेळी माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनीही त्यांना मदत केली. फ्लो


Recent Comments