अधिवेशन सुरु होण्याआधी , स्मार्ट सिटी लिमिटेड तसेच बेळगाव महानगर पालिकेने , शहरात पब्लिक बाईक शेअरिंगचे घाईघाईत उदघाटन करण्यात आले . मात्र ही योजना पंधरा दिवस उलटून गेले तरीदेखील बेळगावकरांसाठी कार्यान्वित न झाल्याने , जनतेतून , मुख्यतः विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
स्मार्ट सिटी अंतर्गत , बेळगावमधील नागरिकांसाठी इ बाईक आणि इ सायकल शेअरिंग ची सुविधा देण्याच्या दृष्टीने पंधरा दिवसांपूर्वी घाईघाईत उदघाटन उरकण्यात आले . सर्वांच्या खिशाला परवडेल अशी ही सुविधा असल्याने बेळगावकर देखील या सुविधेचा लाभ घेण्यास उत्सुक होते . मात्र पंधरा दिवस उलटून गेले तरी अद्याप याचा फायदा लोकांना झाला नाही त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .

या संदर्भात बेनेस्मिथ कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने सांगितले कि , ही सुविधा सुरु होऊन पंधरा दिवस उलटले तरी देखील अद्याप उदघाटनाव्यतिरिक्त इथे काहीच झालेले नाही . जर इ बाईक
आणि इ सायकल शेअरिंग सुरु केले तर आमचा देखील प्रवास खर्च वाचेल . आता रिक्षासाठी खर्च करावा लागतोय तो वाचला असता . लवकरात लवकर संबंधितांनी ही सुविधा सुरु करावी अशी विनंती त्याने केली .
तर खानापूर येथून येणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले कि , कि आम्हा विदयार्थ्यांच्या दृष्टीने ही इ शेअरिंग सुविधा उत्तम होती . पण इथे तर काहीच दिसत नाही . फक्त सायकल स्टॅन्ड आहेत . आम्हाला कुठे जायचे झाले तर परवण्यासारखी ही सुविधा आहे . त्यामुळे स्मार्ट सिटी लिमिटेड ने ही पब्लिक बाईक शेअरिंग सुरु करावे असे सांगितले .
एकंदर बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात , मोठा गाजावाजा करीत आणि अधिवेशनापूर्वी घाईगडबडीत स्मार्ट सिटी कडून , पब्लिक बाईक शेअरिंग सुविधेचे उद्घाटन करण्यात आले होते . त्यामुळे सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या . सर्वांच्याच खिशाला परवडेल अशी ही सुविधा असल्याने सर्वानाच ती आवडली होती . मात्र उदघाटनाखेरीज , या सुविधेची अंमलबजावणी झाली नसल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . लवकरात लवकर पब्लिक बाईक शेअरिंग सुरु करावे अशी मागणी जोर धरत आहे .


Recent Comments