चालता बोलता देव, ज्ञानकोश सिद्धेश्वर स्वामींच्या जाण्याने भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशा शब्दांत धारवाडच्या तपोवनाचे शांतवीर स्वामीजी यांनी सिद्धेश्वर स्वामींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
धारवाडच्या तपोवनात आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना शांतवीर स्वामीजी म्हणाले, धारवाड-हल्याळ रोडला लागून महातपस्वी कुमारेश्वर स्वामीजींचे तपोवन आहे. तेथे सिद्धेश्वर स्वामीजी बालपणापासूनच कुमारेश्वर स्वामीजींच्या समवेत मुक्कामाला येत. जेंव्हा-जेंव्हा सिद्धेश्वर श्री धारवाड किंवा या भागात आले तेव्हा ते तपोवनातच राहत होते. आधीपासूनच त्यांचे राहणीमान साधे-स्वच्छ होते. नेहमी ते आपल्या हाताने साधे हलके जेवण स्वतः बनवून घेत. 2017 मध्ये धारवाड येथील तपोवन येथे एक महिना सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लाखो लोकांनी त्यांच्या प्रवचनांना हजेरी लावली. त्यांनी भक्तांना चांगले मार्गदर्शन केले होते. आश्रमात आलेल्या भक्तांना त्यांनी चांगला सल्ला देऊन सन्मार्गाला लावले अशी आठवण
सिद्धेश्वर श्री साधे होते. येथे आल्यावर ते तपोवनात कुमारस्वामीजींसोबत वेळ घालवत असत. ते स्वतः अन्न तयार करायचे, ते तपोवनातील ज्ञानमंदिरात राहायचे. त्यांच्या दर्शनासाठी केवळ कर्नाटकातूनच नव्हे तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आदी राज्यातून मोठ्या संख्येने लोक येत असत. अशी दिव्य ज्योत विझल्याने राज्यातील जनता दु:खी आहे. लोकांनी त्यांच्यामध्ये चालता-बोलता देव पाहिला. त्यांची उणीव नेहमी भासेल अशा शब्दांत
शांतवीर स्वामीजी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
एकंदर, सिद्धेश्वर स्वामीजी आणि धारवाडचे तपोवन यांच्यातील नाते शांतवीर स्वामीजी यांनी या निमित्ताने उलगडून दाखविले.


Recent Comments