भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव महानगर जिल्हा शाखेतर्फे बेळगाव उत्तर मंडळातील कणबर्गी येथे आज बुथ विजय अभियानाचा जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. 2 ते 12 जानेवारी दरम्यान हे बुथ विजय अभियान होणार आहे.

उत्तर विधानसभा मतदारसंघातील कणबर्गी येथील बुथ क्रमांक 57 येथे आज, सोमवारी सकाळी 9.00 वाजता जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते भाजपचा ध्वज फडकावून बुथ विजय अभियानाचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार संघात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी बूथ स्तरीय विजय अभियान सुरु करण्यात आले आहे. दहा दिवसांच्या या अभियानात प्रत्येक पक्ष कार्यकर्त्याने किमान 25-30 घरांत जाऊन पक्षाच्या राज्य आणि केंद्र सरकारने राबविलेल्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती देऊन लोकांना जागृत करावे. प्रत्येक बूथ पातळीवर पक्षाला किमान एक हजार मते मिळतील याची तयारी करावी असे आवाहन केले.
यावेळी बोलताना राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी, पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य शाखेकडून आलेल्या आदेशानुसार बूथ विजय अभियान राबविण्यात येत आहे. त्यात पक्ष कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन पक्ष मजबूत करावा असे आवाहन केले. बाईट
यावेळी भाजप बेळगाव महानगर जिल्हाध्यक्ष तथा आमदार अनिल बेनके, भाजप राज्य सचिव उज्ज्वला बडवाण्णाचे, तसेच महानगर व मंडळाचे पदाधिकारी, महाशक्ती केंद्र, शक्ती केंद्र, बुथ स्तरावरील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments