बेळगाव शहरात भीमा कोरेगाव विजयोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

रविवारी , बेळगावमध्ये भीमा कोरेगाव विजयोत्सव दिनानिमित्त , प्रारंभी , किल्ला तलाव येथील महार रेजिमेंट येथून विजय ज्योतीची मिरवणूक प्रारंभ करून क्रांतिवीर संगोळी रायन्ना चौक, राणी चन्नम्मा चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.


बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये विजय ज्योतीचे स्वागत करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून 500 शूरवीर महार शिपायांना सलामी देण्यात आली
यानंतर उपस्थित पाहुणे प्रा. के. डी. मंत्रेशी यांनी बेळगाव शहरात भीमा कोरेगाव विजयोत्सव दिन आणि शौर्य गाथेबद्दल माहिती दिली.
यावेळी पालिका उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी देखील भीमा कोरेगाव आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाला योगदान विषयी आपले मनोगत व्यक्त केली
यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, बसवराज रायवगोळ (नोकर संघाचे जिल्हाध्यक्ष), रमेश दयामनव्वर (रिटायर्ड अधिकारी) ऍड . विद्या लकोळी, सुरेश देवरमनी (ऑलम्पिक पट्टू)
यल्लपा कांबळे, सिद्दप्पा कांबळे, मल्लेश कुरंगी, महादेव तळवार,डॉ गजानन कांबळे, मोहन कांबळे, सुनील बस्तवाडकर, रमेश शिरोटे,सहित आंबेडकरी चळवळीतील नेते यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बस्तवाडकर यांनी केले


Recent Comments