Belagavi

बेळगावमध्ये अमरशिल्पी जकनाचारी जयंती निमित्त मिरवणूक

Share

बेळगावमध्ये अमरशिल्पी जकनाचारी यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली . ढोल वाजवून , आ . अनिल बेनके यांनी या मिरवणुकीचा शुभारंभ केला .

रविवारी , बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व सांस्कृतिक विभाग आणि महानगर पालिकेच्या अमरशिल्पी जकानाचारी जयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते . शहरातील किल्ला तलावाजवळील अशोक सर्कलमध्ये आ . अनिल बेनके यांनी ढोल वाजवून या मिरवणुकीला चालना दिली.
ढोल पथक , झांज पथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते .

या मिरवणुकीत कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, वैशाली सुतार, राघवेंद्र हवनूर, मंजुनाथ बडिगेर आणि इतर या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Tags: