Belagavi

आयजीपी सतीश कुमार यांनी जिल्ह्यातील जनतेला दिला नववर्षाच्या शुभेच्छा

Share

कर्नाटक राज्य हे शांतताप्रिय राज्य असून सर्वांनी एकोप्याने राहावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना कर्तव्य बजावण्याचे आयजीपी सतीश कुमार यांनी आवाहन केले.

जिल्हा पोलिस विभागातर्फे रविवारी आयजीपी कार्यालयाच्या सभागृहात नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात केक कापून ते बोलत होते. मागील वर्ष पोलिस खात्यासाठी आव्हानांनी भरलेले होते. ते यशस्वीपणे हाताळण्याचे श्रेय जिल्हा पोलिसांचे जाते, असे ते म्हणाले. नववर्षानिमित्त आयजीपी सतीश कुमार यांनी जिल्हा पोलीस कर्मचारी आणि जनतेला शुभेच्छा दिल्या.

 

एसपी संजीव पाटील, लोकायुक्त एसपी यशोधा वंटगुडी केएसआरपी एस पी हंजा हुसेन, अतिरिक्त एसपी महानिंग नंदगावी आणि उत्तर विभागातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आयजीपी सतीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या. आयजीपींनी जिल्ह्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या

Tags: