विजापूर शहरातील ज्ञान योगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रकृती अस्वास्थामुळे , त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


आश्रमाच्या आवारात पहिल्या मजल्यावर एका खोलीत डॉ.एस.बी. पाटील, डॉ. अरविंद पाटील आणि डॉ.मल्लण्णा मूलीमनी यांच्या नेतृत्वाखाली स्वामीजींवर उपचार सुरू आहेत. स्वामीजी उपचारांना प्रतिसाद देत आहेत. आश्रमाचे अध्यक्ष बसवलिंग स्वामीजी यांनी भाविकांनी स्वामीजींच्या दर्शनासाठी आश्रमात गर्दी करू नये, असे आवाहन केले असून, फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्वामीजींचे दर्शन घेण्याची विनंती केली आहे.



Recent Comments