Belagavi

एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्नीवीर वायू सैनिकांचे प्रशिक्षण यशस्वी

Share

सुमारे 5 दिवसांपासून सुरू असलेल्या सांबरा येथिल एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्नीवीर वायू सैनिकांचे प्रशिक्षण उत्तमरीत्या पार पडले . देशातील विविध राज्यातील सुमारे 2850 अग्नीवीर जवानांनी सहभाग घेतला आणि चांगली कामगिरी केली.

आज शुक्रवारी ,बेळगावच्या सांबरा येथिल एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये भारतीय वायुसेनेचे कमांडिंग ऑफिसर मनमेंद्रसिंग यांनी प्रशिक्षण सरावात सहभागी होऊन सर्व अग्नीवर जवानांना विशेष शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर हवाई दलाची माहिती दिली आणि त्यानंतर या एका प्रशिक्षणाचे साक्षीदार झाले. यावेळी बेळगावचे एअर कमांडर एस श्रीधर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून प्रशिक्षणस्थळांना भेट दिली.

नंतर बोलतांना त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या व प्रशिक्षणादरम्यान सर्वोत्कृष्ट ठरलेल्या प्रशिक्षणार्थीना सन्मानित करण्यात आले व देशसेवेसाठी आलेल्या तुम्हा सर्वांना चांगले काम करून देशसेवेसाठी सज्ज व्हा असे आवाहन केले.

एकूणच, कुंदनगरीमध्ये प्रथम अग्नीवर वायू सैनिकांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले . आणि देशातील अधिकाकाधीक तरुणांनी , अग्नीवर वायू सैनिक व्हावे यासाठी आवाहन करण्यात आले आहे .

Tags:

belagavi-airmen-trainning-scool-completeed-their-training/