Belagavi

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते राणी चन्नमा मिनी प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी भुतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराचे आणि विविध प्राण्यांच्या अधिवासाचे उद्घाटन केले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगाव जिल्ह्यातील ,यमकनमर्डी मतदारसंघातील , भुतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराचे आणि विविध प्राण्यांच्या अधिवासाचे उद्घाटन केले.

यानंतर यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, म्हैसूर प्राणीसंग्रहालयानंतरचे सर्वोत्तम प्राणीसंग्रहालय भूतरामनहट्टी येथे बांधले गेले. प्राणिसंग्रहालयाची विकासकामे 5 टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित टप्पे पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विशेषत: रोजगार हमी योजनेंतर्गत दोन कोटी रुपयांच्या अनुदानातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले की, प्राणिसंग्रहालयाच्या विकास कामात नरेगा प्रकल्पाशी संबंधित कामे ३ महिन्यात पूर्ण केली जातील.

यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ , सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सी.सी.पाटील, खासदार अण्णासाहेब जोल्ले, धर्मादाय , हज व वक्फ विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले, वन विभागाचे अपर मुख्य सचिव जावेद अख्तर, जिल्हा प्रभारी सचिव एल.के. अतिक, प्रादेशिक आयुक्त एम.जी.हिरेमठ, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: