Belagavi

कर्नाटकात गाणिग विकास प्राधिकरण करावे स्थापन

Share

कर्नाटकात गाणिग विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक गाणिग संघर्ष समितीने गुरुवारी सुवर्ण विधानसौधसमोर बस्तवाड येथे आंदोलन केले.

राज्यात गाणिग समुदायाची सुमारे 50 लाख लोकसंख्या आहे. यापैकी 80% गरीब लोक आहेत. गाणिग समाजाच्या विकासासाठी तात्काळ प्राधिकरण स्थापन करावे . शेजारच्या राज्यांमध्ये यापूर्वीच गाणिग समाज प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

बसवराजागंगनहल्लू, परशुराम गडदिन्नी, आदेश रोट्टी, संगनगौडा पाटील, राजकुमार टोपण्णावर , मंगला शेट्टी, गुरन्ना गोडी आदी उपस्थित होते

Tags: