Belagavi

उद्याच्या विषयांवर आजच होणार चर्चा : आ. ए. एस. नडहळ्ळी

Share

सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या अधिवेशनात उद्याचे विषयही आजच चर्चेसाठी घेतले जाणार असल्याचे आमदार ए. एस. नडहळ्ळी यांनी सांगितले.

ते आज सुवर्णसौधा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्या अधिवेशन एक दिवस आधीच संपणार आहे ते अमित शहा येणार असल्याने नव्हे तर उद्या विजापूरमध्ये काँग्रेसचा मेळावा होणार आहे. आजच्या चर्चेसाठी उद्याचे विषय पटलावर घेतले जातील असे आमदार नडहळ्ळी म्हणाले.

काल उत्तर कर्नाटकच्या समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित होते. मी सभापती, विरोधी पक्षनेते यांना आवाहन केले होते. प्रत्येक वेळी पहिल्या दिवशीच चर्चा व्हायला हवी आणि त्याचा निर्णय नि:पक्षपातीपणे व्हायला हवा  उत्तर कर्नाटकच्या विकासाकडे लक्ष द्या, सभागृहात चर्चा करा, ब्लू प्रिंटवर चर्चा करा. या भागाच्या समस्येवर चर्चा होणे अपेक्षित होते. विरोधी पक्षाचे नेते बदामीचे आहेत. त्यांनी याबाबत परवानगी द्यायला हवी होती, या समस्येवर चर्चा न करणे आम्हाला परवडणारे नाही. असे नाही की आपण निराश झालो आहोत. हुबळी विमानतळाचा दर्जा वाढवावा, या भागात मालवाहू उड्डाणे सुरू करावीत. कुकर बॉम्बस्फोट हा दहशतवादाचा मुद्दा आहे, त्यावर चर्चा का होऊ नये?, कोणतेही सरकार असो, मी लोकांच्या समस्यांबाबत वारंवार आग्रह धरला आहे असे ते म्हणाले.

Tags: