Belagavi

अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकाच्या समस्यांबाबत कोणतीही चर्चा नाही

Share

सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकाच्या समस्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याचप्रमाणे उत्तर कर्नाटकातील आमदारांना बोलू दिले नाही. असे केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी सांगितले .

त्यांनी आज भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नमा प्राणी संग्रहालयाच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला . सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकच्या समस्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. उत्तर कर्नाटकातील आमदारांना बोलू दिले नाही.

काल त्यांनी केवळ एक दिवस चर्चेला परवानगी दिली. पहिल्या दिवशीच चर्चेला परवानगी द्यायला हवी होती. आम्हाला संधी दिली असती तर आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. शेवटच्या दिवशी संधी दिल्यास काहीही चर्चा होऊ शकत नाही.या सुवर्णसौधमध्ये उत्तर कर्नाटकच्या समस्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. असे आ . सतीश जारकीहोळी यांनी सांगितले .

Tags: