Belagavi

श्री संत सेना मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी किरण जाधव यांच्याकडून आर्थिक मदत

Share

बेळगाव येथील नाभिक समाज सुधारणा मंडळ श्री संत सेना मंदिराचे नूतनीकरण सुरू आहे त्यासाठी लागणाऱ्या सामग्री साठी कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सेक्रेटरी व मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्याशी चर्चा करण्यात आली.

त्या करता किरण जाधव यांनी मंदिराच्या जीर्णोद्धराकरिता रोख रक्कम दिलेली आहे व मंदिर व हॉल चांगल्या प्रकारे कसा बांधता येईल व सरकारकडून निधी प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करू असे सांगितले.

समाजासाठी व समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळी समाजातील प्रमुख गणेश यादव चंद्रकांत पन्हाळकर ,महादेव वाघमारे कृष्ण पवार सुनील देवकरअशोक गंगाधर यावेळी उपस्थित होते.

Tags: