Belagavi

राज्यातील रस्त्यांवरचे अशास्त्रीय गतिरोधक काढून टाका : सिद्धरामय्या

Share

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशास्त्रीय गतिरोधक, हम्प्समुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे ते काढून टाका अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आज विधानसभेत केली.

राज्यातील अवैज्ञानिक पद्धतीने घातलेले गतिरोधक, हम्प्समुळे प्रवाशांना त्रास होत असल्याने ते काढून टाकण्याची मागणी सिद्दरामय्या यांनी केली. त्यावर बोलताना जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, अशास्त्रीय गतिरोधकांमुळे जनतेचे हाल होत असल्याचे माझ्याही निदर्शनास आले आहे, मात्र स्थानिक आमदार त्यात अडथळा आणत आहेत, त्यामुळे आमदारांनी रस्त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये यासाठी कारवाई करण्यात येईल.

त्यावर असे गतिरोधक काढून टाकण्यासाठी आमदारांची संमती कशाला हवी, लोकांना संचार करताना अडचण येत आहे, ते काढून टाका अशी मागणी सिद्दरामय्या यांनी लावून धरली. त्याला मान हलवत स्वीकृती देत मंत्री कारजोळ यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन अवैज्ञानिक गतिरोधक काढून टाकण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगितले.

Tags:

remove-unwanted-speed-breaker-from-road-siddaramayyaih/